महिला विकास समितीची कामे
महिलांचे सक्षमीकरण
- महिलांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपक्रम राबवणे.
- स्वयंसहायता गट (SHG) स्थापन करणे व त्यांना मार्गदर्शन करणे.
स्वयंसहायता गटांचे प्रोत्साहन
- गटांना लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला आदींसाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
- बचत व पत व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणे.
शासकीय योजना व लाभ
- महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देणे.
- विधवा, परित्यक्ता, एकल महिला यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.
महिला व बाल आरोग्य
गर्भवती व स्तनदा मातांसाठी आरोग्यविषयक जनजागृती करणे.
अंगणवाडी, बालवाडी यांच्याशी समन्वय साधून बालकांचे पोषण व लसीकरण सुनिश्चित करणे.
महिला हक्क संरक्षण
घरगुती हिंसा, छळ किंवा अन्याय झाल्यास पीडित महिलांना कायदेशीर व सामाजिक मदत उपलब्ध करून देणे.
पोलीस प्रशासन व समाजकल्याण विभागाशी समन्वय साधणे.
सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम
महिलांसाठी सांस्कृतिक, क्रीडा, वाचनालय उपक्रम राबवणे.
महिलांना संगणक शिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.
जनजागृती मोहिमा
- बालविवाह प्रतिबंध, कन्या भ्रूणहत्या, लैंगिक समता याविषयी प्रचार करणे.
- “बेटी बचाओ, बेटी पढाओ” सारख्या उपक्रमांना चालना देणे.
महिला विकास समिती वरील पदाधिकारी
- श्री. श्रीकृष्ण यशवंत जोशी – अध्यक्ष
- श्री. अक्षय बाळू चोपडे – सचिव
- श्री. अनिल पांडुरंग आंब्रे – सदस्य
- श्री. दिलीप जणू घरवे – सदस्य
- सौ. साक्षी संतोष लाड – सदस्य
- श्री. सदशिव चंदन मुकणा – सदस्य
- श्री. महादेव बाळू शिंदे – सदस्य
- श्री. सुभाष श्रीपत आंबडस्कर – सदस्य
- श्री. प्रविण प्रकाश वाघमारे – सदस्य
- सौ. रसिका रमेश घरवे – सदस्य